Posts

Showing posts from 2020

२६ एप्रिलची काळरात्र (भाग १)

Image
२६ एप्रिल ची काळरात्र (भाग १): एचबीओ वाहिनीने बनवलेल्या  'चेर्नोबील'  मिनिसिरीजने या मानवनिर्मित अपघाताची भीषणता मनाला भिडते. आपल्याला हे प्रखरतेने जाणवते कि १९८६ म्हणजे ३५ वर्षांपूर्वीची हि घटना असली तरी त्याच्या किरणोत्साराचे दुष्परिणाम ५०० हुन अधिक वर्षे टिकून रहाणारे आहेत. वेळेची हि मोठी फुटपट्टी वापरून विचार केला तर ३५ वर्ष हा तर नगण्य कालावधी आहे. या मालिकेने उत्सुकता चाळवल्याने याविषयी अधिक माहिती शोधायचा प्रयत्न केला. नक्की काय घडले होते? काय चुका झाल्या? त्याचे भयावह परिणाम काय झाले?  यासर्व प्रश्नांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला. जगभरातील तज्ञांनी या अपघातावर अनेक तर्कवितर्क लावले आहेत. वेगवेगळ्या थिअरी मांडल्या आहेत. या अपघाताची नांदी अनेक मानवी चुकांचा परिपाक आहे. त्यामुळे जेवढे समजले आणि पटले ते आपल्या भाषेत आपल्या माणसांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.   ओसाड पडलेले प्रिप्यात शहर आणि मागे  दिसणारे अणुऊर्जा केंद्र (स्रोत: विकिमिडीया कॉमन्स) वर्ष १९८६. सोव्हिएत  संघराज्यातील कीव्ह शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर नव्याने वसवण्यात आलेले प्रिप्यात शहर. (कीव्ह

मांसभक्षी वनस्पती: द लिटल शॉप ऑफ हॉररस

Image
स्रोत: favpng.com हा विषय मला सुचवला गेला तेव्हाच माझ्या लहानपणी पहिलेला एक चित्रपट माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. पण त्यावेळी चित्रपटाचे नाव बघितले नव्हते, मधूनच बघायला सुरुवात केली होती. मग थोड इंटरनेटवर धुंडाळून आधी नावाचा पत्ता लावला. 'द लिटल शॉप ऑफ हॉररस' हा १९६० साली प्रदर्शित झालेला विनोदी भयपट. यामधील नायक हा फुलांच्या दुकानात काम करणारा गरीब धांदरट नोकर. मालकाची खप्पा मर्जी होऊ नये आणि नोकरी शाबूत रहावी या विवंचनेत असतानाच त्याने खटपटी करून एक संकरित रोप बनवलेले आहे. मात्र थोड्याच दिवसात त्याला हे विचित्र दिसणारे रोप मांसभक्षी असल्याचा शोध लागतो. रोपाची भूक प्रचंड आहे त्यामुळे आता त्याला खाऊ घालण्यासाठी नायकाला लपून छपून माणसे मारून आणावी लागतात. रोपाची वाढ दिवसागणिक भराभर होऊ लागते. शहरात चर्चेला तोंड फुटते आणि आता अगदी छताला भिडणारे, मोठे घुमटाकार दिसणारे हे झाड बघायला दुकानात माणसे गर्दी करतात. त्यापुढे काय होते ते प्रत्यक्ष पाहणे जास्त रंजक ठरेल. पण यानिमित्ताने मांसभक्षी वनस्पतींबद्दल कुतूहल चाळवले जाणे साहजिक आहे. आता लेखाच्या सुरुवातीलाच हे

टोळ धाड: एक आश्चर्यकारक जागतिक समस्या

Image
लहानपणी मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट सगळ्यांनीच  ऐकली असेल. मुंगी उन्हाळ्याच्या दिवसात सतत काम करून आपल्या अन्नाची बेगमी करून ठेवते तर नाकतोडा तिची खिल्ली उडवत गाणी गात राहतो आणि काही काम न करता पायावर पाय टाकून आराम करतो. असा हा आळशी आणि मंदगती नाकतोडा अचानक चर्चेत आला तो हल्ली पश्चिम मध्य भारतात आलेल्या टोळधाडीमुळे. करोडोंच्या संख्येने टोळांचा थवा जेव्हा मार्गक्रमण करू लागतो तेव्हा वाटेत येणाऱ्या प्रत्येक शेतीमालाचा फन्ना उडवत जातो.  आपल्याकडे हा विध्वंस सवयीचा नसला तरी काही देशांमध्ये याचा प्रकोप भयानक म्हणावा इतका आहे. एरव्ही शांत आणि थंड असणारा हा एकाकी  प्राणी झुंडीमध्ये  पिसाळल्यासारखा कसा वागू लागतो  याची उत्सुकता वाटून माहिती शोधायला सुरुवात केली आणि काही आश्चर्यजनक तथ्ये समोर आली. या लेखाद्वारे आपल्या सर्वांपर्यंत हि रंजक माहिती पोहोचावी म्हणून हा प्रयत्न. टोळ हा नाकतोड्याचाच भाऊबंद. दोघेही ' ऑर्थोप्टेरा ' (orthoptera ) या एकाच कुटुंबातील अपृष्ठवंशीय कीटक.  हा पूर्णपणे शाकाहारी असून त्याला इतर कीटकांप्रमाणेच  पायाच्या तीन जोड्या असतात. अंगावर कडक बाह्य आवरण असू

लसीकरणाचे स्पष्टीकरण (उत्तरार्ध)

Image
आपण या लेखमालेच्या पूर्वार्धात बघितले कि आपली संरक्षण यंत्रणा किंबहुना अँटीबॉडी निर्माण करण्याची यंत्रणा कशी काम करते. हे कार्य विस्तृतपणे सांगण्याचा उद्देश असा कि कोणतीही लस याच यंत्रणेला हाताशी धरून आपला हेतू साध्य करते. त्यामुळे लसीकरणामागचा सिद्धांत समजायला आता जास्त सोपे जाईल. लसीकरणाचे  तत्व: लस हा प्रकार साधारणतः ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध योग्य’ या तत्वावर चालतो.  अगदी थोडक्यात माहिती द्यायची झाली तर असं म्हणूया कि ज्या जिवाणू अथवा विषाणूंमुळे आजार होतो त्यांना क्षीण करून, मारून  अथवा त्यांचे लहान  शारीरिक भाग (तुकडे) हे आपल्या शरीरामध्ये टोचले जातात. जर या सूक्ष्मजीवांनी स्त्रवलेला एखादा विषारी घटक रोगकारक ठरत असेल तर त्यावर प्रक्रिया करून त्याची तीव्रता नष्ट केली जाते आणि लसी च्या रूपात वापर केला जातो. याचा अर्थ असा कि निष्प्रभ स्वरूपात अँटीजेन आपणच शरीराला पुरवतो. याचा परिणाम म्हणून शरीर त्या विरोधात आपली स्पेशल फोर्स (अँटीबॉडी) कशी उभी करते ते आपण लेखाच्या मागील भागात  समजून घेतले आहेच. पण हा प्रातिनिधिक स्वरूपाचा हल्ला तर आपण कृत्रिमरीत्या घडवून आणलेला आहे. कारण य

लसीकरणाचे स्पष्टीकरण (पूर्वार्ध)

Image
थोडासा इतिहास: कोविड १९ च्या निमित्ताने विविध उपचार पद्धतींचा उहापोह चालू झाला आहे. माझ्या मागील ब्लॉगनंतर काही आप्तजणांनी ‘पोलिओ लस असते तशी याची नाही का? लसीकरण म्हणजे नक्की काय? लस म्हणजे औषधच ना?’ अशा प्रश्नाची सरबत्ती केली. या उत्सुकतेत भर म्हणजे नुकतेच बातम्यात सांगितले गेले कि जर्मनी, UK मध्ये संशोधित कोविड लसी ला मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. हि बातमी जरी थोड्याफार प्रमाणात सकारात्मक असली तरी अजून हि लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यास वर्षाचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. एवढा दीर्घ कालावधी का लागतो याचा खुलासा पुढे होईलच पण मुळात ‘लसीकरण’ हा विषय समजून घ्यायला अतिशय रंजक आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे एखाद्या विकसित देशाची सुसज्ज संरक्षण यंत्रणा आहे. खरतर एवढी सुसूत्रतेने बांधलेली, सुनियोजित, प्रचंड तत्पर सैन्यदले कुठल्याही देशाशी तुलना होऊच शकत नाही. हल्ला करणाऱ्या शत्रू नुसार आपली मोर्चेबांधणी इतक्या काटेकोर पणे केली जाते कि या यंत्रणेचे कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही. एवढी जटील संरक्षण व्यवस्था घेऊन आपण फिरत असतो याची कल्पना आपल्यालाच नाहीये. परंतु हि प

कोरोना: समज गैरसमज

Image
एखाद्या विषाणूचा आकार केवढा? तर जिवाणू पेक्षा जवळ जवळ सहस्त्र पट लहान. उदाहरणच द्यायचं झालं तर असं बघा कि १ मीटर हे लांबीचे परिमाण आपल्याला माहित आहे. सर्वसाधारण माणसाची उंची ६ फूट मानली तर कमरेपर्यंत उंची १ मीटर होते. आता या मीटरभर लांबीचे हजार समान तुकडे केले तर आपल्याला १ मिलीमीटर चा एक तुकडा मिळतो. त्याचे आणखी १००० तुकडे करा. आता प्रत्येक तुकडा एक मायक्रोमीटर लांबीचा आहे. जिवाणूंची सरासरी लांबी १ ते १० मायक्रोमीटर मध्ये भरते. आपल्याला जीवाणू प्रयोगशाळेतील प्रकाशी सूक्ष्मदर्शी खाली पाहता येऊ शकतो. पण तो सुद्धा दिसतो रव्याच्या कणाइतका. आता या एका मायक्रो मीटर चे समान १००० भाग केले कि एक भाग एक नॅनोमीटर  होईल. विषाणूचा आकार २० ते २०० नॅनोमीटर  मध्ये भरतो. एवढा सूक्ष्मातिसूक्ष्म आकार तर साध्या सूक्ष्मदर्शितही दिसू शकत नाही.   मीटर ते nanometer आकाराची तुलना दर्शवणारा तक्ता  असा हा अति सूक्ष्म विषाणू जीवाणूला सुद्धा मारू शकतो. असं काय भयानक हत्यार आहे या सूक्ष्मजीवांत?... तीव्र आम्ल ? पाचक विकरे? विषारी डंख ? नाही. मुळात याला जीव म्हणावे का हाच प्रश्न आहे. याची संरचना अतिशय स