Posts

Showing posts with the label #nuclear_disaster

२६ एप्रिल ची काळरात्र: भाग २ (उत्तरार्ध )

Image
मुख्य अभियंते डिएटलॉव्ह रात्रपाळीच्या सहकाऱ्यांना सूचना देऊ लागले. दिवसपाळीच्या कर्मचाऱ्यांनी दुपारीच   ३२००मेगावॅट  च्या ताकदीची  भट्टी  १६०० मेगावॅट वर आणून स्थिर केलेली होती मात्र चाचणीसाठी ७०० मेगावॅट पर्यंत औष्णिक क्षमता घटवणे गरजेचे होते. रात्री अकराच्या सुमारास ऊर्जा घटवणे सुरु झाले, सगळे बोरॉन गज आत सरकवले होते आणि पाण्याचे पम्प पूर्ण क्षमतेने भट्टी मध्ये पाणी पुरवत होते. ऊर्जा एका विशिष्ट प्रमाणात कमी होत जायला हवी होती पण काहीतरी गडबड झाली होती. ऊर्जा अतिशय वेगाने घटत चालली. शेवटी तासाभराने ती ३० मेगावॅटला येऊन पोचली होती. इतक्या कमी उर्जेवर भट्टीमधून फिरणारे पाणी उकळणे अशक्य होते. मग जनित्रे चालणे तर दूरची गोष्ट. आता घाईघाईत अभिक्रिया वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यासाठी बोरॉनचे शोषक गज बाहेर खेचणे सुरु केले . झटपट ऊर्जा वाढवण्याच्या नादात २०० गजांपैकी फक्त ८ गज आत ठेवून बाकी सर्व बाहेर ओढले गेले. आता  गाभ्याची उष्णता  पुन्हा वाढू लागली. २००  मेगावॅट पर्यंत वाढ झाल्यावर चाचणी सुरु करण्याचा फर्मान सुटला. हि ऊर्जासुद्धा पुरेशी नव्...

२६ एप्रिलची काळरात्र (भाग १)

Image
२६ एप्रिल ची काळरात्र (भाग १): एचबीओ वाहिनीने बनवलेल्या  'चेर्नोबील'  मिनिसिरीजने या मानवनिर्मित अपघाताची भीषणता मनाला भिडते. आपल्याला हे प्रखरतेने जाणवते कि १९८६ म्हणजे ३५ वर्षांपूर्वीची हि घटना असली तरी त्याच्या किरणोत्साराचे दुष्परिणाम ५०० हुन अधिक वर्षे टिकून रहाणारे आहेत. वेळेची हि मोठी फुटपट्टी वापरून विचार केला तर ३५ वर्ष हा तर नगण्य कालावधी आहे. या मालिकेने उत्सुकता चाळवल्याने याविषयी अधिक माहिती शोधायचा प्रयत्न केला. नक्की काय घडले होते? काय चुका झाल्या? त्याचे भयावह परिणाम काय झाले?  यासर्व प्रश्नांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला. जगभरातील तज्ञांनी या अपघातावर अनेक तर्कवितर्क लावले आहेत. वेगवेगळ्या थिअरी मांडल्या आहेत. या अपघाताची नांदी अनेक मानवी चुकांचा परिपाक आहे. त्यामुळे जेवढे समजले आणि पटले ते आपल्या भाषेत आपल्या माणसांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.   ओसाड पडलेले प्रिप्यात शहर आणि मागे  दिसणारे अणुऊर्जा केंद्र (स्रोत: विकिमिडीया कॉमन्स) वर्ष १९८६. सोव्हिएत  संघराज्यातील कीव्ह शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर नव्याने वसवण्यात आ...