Posts

Showing posts from May, 2021

२६ एप्रिल ची काळरात्र: भाग २ (उत्तरार्ध )

Image
मुख्य अभियंते डिएटलॉव्ह रात्रपाळीच्या सहकाऱ्यांना सूचना देऊ लागले. दिवसपाळीच्या कर्मचाऱ्यांनी दुपारीच   ३२००मेगावॅट  च्या ताकदीची  भट्टी  १६०० मेगावॅट वर आणून स्थिर केलेली होती मात्र चाचणीसाठी ७०० मेगावॅट पर्यंत औष्णिक क्षमता घटवणे गरजेचे होते. रात्री अकराच्या सुमारास ऊर्जा घटवणे सुरु झाले, सगळे बोरॉन गज आत सरकवले होते आणि पाण्याचे पम्प पूर्ण क्षमतेने भट्टी मध्ये पाणी पुरवत होते. ऊर्जा एका विशिष्ट प्रमाणात कमी होत जायला हवी होती पण काहीतरी गडबड झाली होती. ऊर्जा अतिशय वेगाने घटत चालली. शेवटी तासाभराने ती ३० मेगावॅटला येऊन पोचली होती. इतक्या कमी उर्जेवर भट्टीमधून फिरणारे पाणी उकळणे अशक्य होते. मग जनित्रे चालणे तर दूरची गोष्ट. आता घाईघाईत अभिक्रिया वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यासाठी बोरॉनचे शोषक गज बाहेर खेचणे सुरु केले . झटपट ऊर्जा वाढवण्याच्या नादात २०० गजांपैकी फक्त ८ गज आत ठेवून बाकी सर्व बाहेर ओढले गेले. आता  गाभ्याची उष्णता  पुन्हा वाढू लागली. २००  मेगावॅट पर्यंत वाढ झाल्यावर चाचणी सुरु करण्याचा फर्मान सुटला. हि ऊर्जासुद्धा पुरेशी नव्हतीच पण कर्मचाऱ्यांचा नाईलाज होता. घड्य