Posts

Showing posts from June, 2020

टोळ धाड: एक आश्चर्यकारक जागतिक समस्या

Image
लहानपणी मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट सगळ्यांनीच  ऐकली असेल. मुंगी उन्हाळ्याच्या दिवसात सतत काम करून आपल्या अन्नाची बेगमी करून ठेवते तर नाकतोडा तिची खिल्ली उडवत गाणी गात राहतो आणि काही काम न करता पायावर पाय टाकून आराम करतो. असा हा आळशी आणि मंदगती नाकतोडा अचानक चर्चेत आला तो हल्ली पश्चिम मध्य भारतात आलेल्या टोळधाडीमुळे. करोडोंच्या संख्येने टोळांचा थवा जेव्हा मार्गक्रमण करू लागतो तेव्हा वाटेत येणाऱ्या प्रत्येक शेतीमालाचा फन्ना उडवत जातो.  आपल्याकडे हा विध्वंस सवयीचा नसला तरी काही देशांमध्ये याचा प्रकोप भयानक म्हणावा इतका आहे. एरव्ही शांत आणि थंड असणारा हा एकाकी  प्राणी झुंडीमध्ये  पिसाळल्यासारखा कसा वागू लागतो  याची उत्सुकता वाटून माहिती शोधायला सुरुवात केली आणि काही आश्चर्यजनक तथ्ये समोर आली. या लेखाद्वारे आपल्या सर्वांपर्यंत हि रंजक माहिती पोहोचावी म्हणून हा प्रयत्न. टोळ हा नाकतोड्याचाच भाऊबंद. दोघेही ' ऑर्थोप्टेरा ' (orthoptera ) या एकाच कुटुंबातील अपृष्ठवंशीय कीटक.  हा पूर्णपणे शाकाहारी असून त्याला इतर कीटकांप्रमाणेच  पायाच्या तीन जोड्या असतात. अंगावर कडक बाह्य आवरण असू