लसीकरणाचे स्पष्टीकरण (उत्तरार्ध)
आपण या लेखमालेच्या पूर्वार्धात बघितले कि आपली संरक्षण यंत्रणा किंबहुना अँटीबॉडी निर्माण करण्याची यंत्रणा कशी काम करते. हे कार्य विस्तृतपणे सांगण्याचा उद्देश असा कि कोणतीही लस याच यंत्रणेला हाताशी धरून आपला हेतू साध्य करते. त्यामुळे लसीकरणामागचा सिद्धांत समजायला आता जास्त सोपे जाईल. लसीकरणाचे तत्व: लस हा प्रकार साधारणतः ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध योग्य’ या तत्वावर चालतो. अगदी थोडक्यात माहिती द्यायची झाली तर असं म्हणूया कि ज्या जिवाणू अथवा विषाणूंमुळे आजार होतो त्यांना क्षीण करून, मारून अथवा त्यांचे लहान शारीरिक भाग (तुकडे) हे आपल्या शरीरामध्ये टोचले जातात. जर या सूक्ष्मजीवांनी स्त्रवलेला एखादा विषारी घटक रोगकारक ठरत असेल तर त्यावर प्रक्रिया करून त्याची तीव्रता नष्ट केली जाते आणि लसी च्या रूपात वापर केला जातो. याचा अर्थ असा कि निष्प्रभ स्वरूपात अँटीजेन आपणच शरीराला पुरवतो. याचा परिणाम म्हणून शरीर त्या विरोधात आपली स्पेशल फोर्स (अँटीबॉडी) कशी उभी करते ते आपण लेखाच्या मागील भागात समजून घेतले आहेच. पण हा प्रातिनिधिक स्वरूपाचा हल्ला तर आपण कृत्रिमरीत्या घडवून आणलेला आहे. कारण य