Posts

Showing posts from November, 2020

२६ एप्रिलची काळरात्र (भाग १)

Image
२६ एप्रिल ची काळरात्र (भाग १): एचबीओ वाहिनीने बनवलेल्या  'चेर्नोबील'  मिनिसिरीजने या मानवनिर्मित अपघाताची भीषणता मनाला भिडते. आपल्याला हे प्रखरतेने जाणवते कि १९८६ म्हणजे ३५ वर्षांपूर्वीची हि घटना असली तरी त्याच्या किरणोत्साराचे दुष्परिणाम ५०० हुन अधिक वर्षे टिकून रहाणारे आहेत. वेळेची हि मोठी फुटपट्टी वापरून विचार केला तर ३५ वर्ष हा तर नगण्य कालावधी आहे. या मालिकेने उत्सुकता चाळवल्याने याविषयी अधिक माहिती शोधायचा प्रयत्न केला. नक्की काय घडले होते? काय चुका झाल्या? त्याचे भयावह परिणाम काय झाले?  यासर्व प्रश्नांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला. जगभरातील तज्ञांनी या अपघातावर अनेक तर्कवितर्क लावले आहेत. वेगवेगळ्या थिअरी मांडल्या आहेत. या अपघाताची नांदी अनेक मानवी चुकांचा परिपाक आहे. त्यामुळे जेवढे समजले आणि पटले ते आपल्या भाषेत आपल्या माणसांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.   ओसाड पडलेले प्रिप्यात शहर आणि मागे  दिसणारे अणुऊर्जा केंद्र (स्रोत: विकिमिडीया कॉमन्स) वर्ष १९८६. सोव्हिएत  संघराज्यातील कीव्ह शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर नव्याने वसवण्यात आलेले प्रिप्यात शहर. (कीव्ह