Posts

Showing posts from July, 2020

मांसभक्षी वनस्पती: द लिटल शॉप ऑफ हॉररस

Image
स्रोत: favpng.com हा विषय मला सुचवला गेला तेव्हाच माझ्या लहानपणी पहिलेला एक चित्रपट माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. पण त्यावेळी चित्रपटाचे नाव बघितले नव्हते, मधूनच बघायला सुरुवात केली होती. मग थोड इंटरनेटवर धुंडाळून आधी नावाचा पत्ता लावला. 'द लिटल शॉप ऑफ हॉररस' हा १९६० साली प्रदर्शित झालेला विनोदी भयपट. यामधील नायक हा फुलांच्या दुकानात काम करणारा गरीब धांदरट नोकर. मालकाची खप्पा मर्जी होऊ नये आणि नोकरी शाबूत रहावी या विवंचनेत असतानाच त्याने खटपटी करून एक संकरित रोप बनवलेले आहे. मात्र थोड्याच दिवसात त्याला हे विचित्र दिसणारे रोप मांसभक्षी असल्याचा शोध लागतो. रोपाची भूक प्रचंड आहे त्यामुळे आता त्याला खाऊ घालण्यासाठी नायकाला लपून छपून माणसे मारून आणावी लागतात. रोपाची वाढ दिवसागणिक भराभर होऊ लागते. शहरात चर्चेला तोंड फुटते आणि आता अगदी छताला भिडणारे, मोठे घुमटाकार दिसणारे हे झाड बघायला दुकानात माणसे गर्दी करतात. त्यापुढे काय होते ते प्रत्यक्ष पाहणे जास्त रंजक ठरेल. पण यानिमित्ताने मांसभक्षी वनस्पतींबद्दल कुतूहल चाळवले जाणे साहजिक आहे. आता लेखाच्या सुरुवातीलाच हे